जामखेड न्युज——
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे येथील युवक कार्यकर्ते शत्रुघ्न भोसले यांची छावा क्षात्रवीर युवक संघटना सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

१७ आॅगस्ट रोजी भंडीशेगाव येथे छावा क्षात्रवीर सेनेने एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये बेंबळे तालुका माढा येथील माननीय शत्रुघ्न भोसले यांची छावा क्षात्रवीर युवक संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री समाधान दादा सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील आढावा बैठक व पद नियुक्ती कार्यक्रम पार पडला.

शत्रुघ्न भोसले यांची सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी.
लक्ष्मण सुरवसे यांची शेतकरी सेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली
यावेळी नुतन जिल्हाअध्यक्ष शत्रुघ्न भोसले यांनी बोलताना सांगितले की गाव तिथे शाखा शाखा तिथे समाजसेवा या ब्रीदवाक्य प्रमाणे सर्वसामान्य पर्यंत जनतेपर्यंत पोहोचवून संघटनेचे कार्य घरोघरी जाऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार.
युवा योगासाठी रात्रीचा दिवस करून संघटना वाढवणार तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून सर्व घटकांना सोबत घेऊन न्याय मिळवून देऊ संघटनेचे ब्रीदवाक्यप्रमाने काम चालू ठेवू.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष विद्यार्थी सेना विजय कदम शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख लक्ष्मण सुरवसे .युवा जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न भोसले. कामगार आघाडी जिल्हाप्रमुख वैभव कांबळे.
शिवाजी काकडे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी.व छावा सैनिक उपस्थित होते
त्यांच्या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यात सर्व स्तरातून त्यांच्या निवडीबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या
तसेच माढा तालुक्याचे आमदार मा. श्री बबन दादा शिंदे व पंचायत समिती कुर्डूवाडीचे विद्यमान सभापती विक्रम विक्रम दादा शिंदे यांच्या सह विविध मान्यवर मित्रमंडळी यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.