जामखेड न्युज——
अहमदनगर पुणे महामार्गावर वांघुडें शिवारात पुण्याकडून नगरच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरने रस्ताच्या कडेला उभे असलेल्या दोघांना चिरडले असुन यात दोघे जागीच ठार झाले आहेत.

याबाबत सुपा पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १.०० वाजन्याच्या दरम्यान अहमदनगर-पुणे महामार्गावर पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला वांघुडे गावच्या शिवारात एका मोटारसायकल वाल्याने कट मारला कंटेनर चालकाने मोटार सायकलस्वराला वाचवण्याचा प्रयत्न केला.

त्यात मोटार सायकलस्वार बचावला. मात्र त्याच वेळी रस्ताच्या कडेला उभे असलेले दोघांच्या अंगावर कंटेनर गेल्याने या दोघांना कंटेनरने चिरडले. यात दोघेही जागीच ठार झाल्याचे प्राथमिक वृत आहे .

अपघाताची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ नितीनकुमार गोकावे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तेथील परिस्थितीचे पंचनामे करून मृतदेह उत्तराय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

कंटेनर चालक घटनास्थळावरुन फरार झाला असुन सुपा पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन सुपा पोलिस स्टेशनला आणला असुन पोलिस कंटेनर चालकाचा शोध घेत आहे.