जामखेड न्युज——

दिडशे वर्षाच्या गुलामगिरीतुन आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले बलीदान दिले. यातून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्य व तिरंगा ध्वज आपला अभिमान व स्वाभीमान आहे. असे मत आमदार प्रा. राम शिंदे यांनी जामखेड न्युजशी बोलताना व्यक्त केले.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसील कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार शिंदे बोलत होते. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, अशोक शेळके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे, वैद्यकीय अधिक्षक संजय वाघ, माने साहेब, मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाने, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, अमित चिंतामणी, रवी सुरवसे, बिबिषण धनवडे, पोपट राळेभात, प्रविण चोरडिया, उद्धव हुलगंडे, तात्याराम पोकळे, कॅप्टन लक्ष्मण भोरे सह पोलीसदल, अनेक ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य दिन हा संपुर्ण देशाचा सण आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने आमदार शिंदे यांनी कर्जत जामखेड सह नगर जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी शुभेच्छा देताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी बलीदान दिले त्यांच्या स्मरणार्थ आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपणा सर्वांना मिळाले आहे. आपण सर्वच भाग्यवान आहोत. सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ शुभेच्छा देताना म्हणाले की, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपल्या स्वातंत्र्य वीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले या सर्व शुर वीरांचे स्मरण करण्यासाठी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोत आपल्या तालुक्यात सुमारे २८ हजार कुटुंबीयांनी तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविला हिच खरी राष्ट्रभक्ती आहे. आज सहा वाजता सन्मानपूर्वक ध्वज उतरवून ठेवू असे आवाहन पोळ यांनी केले.
पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड शुभेच्छा देताना म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व साक्षीदार आहोत. सर्व जण भाग्यवान आहोत, संपुर्ण देशात चांगला सोहळा साजरा होत आहे. आपण सर्व एकत्रित शांततेत सोहळा साजरा करतोत “हिंदी है हम वतन है हमारा” भविष्यातही आपण सर्व शांततेच्या मार्गाने देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावू असे आवाहन केले.