जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——

वयाच्या १०४ व्या वर्षीही आपल्या सुश्राव्य वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत कीर्तन सेवा देत आहेत.
तालुक्यातील जमदारवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता वैराग्यचे महामेरू ह. भ. प. रघुनाथ महाराज धामनगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

गेली सात दिवस या सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकार यांनी प्रबोधन केले गेली एकोणतीस वर्षे चालत असलेला हा नामसप्ताहात मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

यामध्ये सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हारीपाठ, किर्तन, जमलेल्या सर्व भाविक भक्तांना दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सामुहिक भजनाचा कार्यक्रम व त्या नंतर वारकरी कैलास महाराज भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काकडा भजन होत असे

गावातील शिवशक्ती तरूण मंडळाने भोजन वाढण्याची व्यवस्था केली होती गेली सात दिवस या तरूंणांनी वारकर्यांची सेवा केली.

या नामसप्ताहात दररोज पाञ उचलने व स्वच्छता ठेवणारे रामा डाडर, निलेश डाडर, यांचा फेटा बांधुन ग्रामस्थांनी सत्कार केला.
वयाच्या एकशे चार वर्षे असतानाही रघुनाथ बाबांनी अतिशय सुंदर आवाजात किर्तन केले महाराज गेली एकोणतीस वर्षे जमदारवाडी येथे किर्तन सेवा करतात संत वामनभाऊ महाराजांचे आवडते शिष्य म्हणून महाराजांची ख्याती आहे महाराज बाल ब्रम्हचारी आहेत.
यावेळी बोलताना महाराज म्हणाले की काळ बदलत चालला आहे आई ही मुलाची पहिली गुरू असते त्यामुळे आईने मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे व आजच्या पिढीने आपल्या आई वडिलांना संभाळावे संतांच्या पवित्र भुमित वृध्दाश्रम हे खेदजनक आहे जुन्या काळातील संस्कृतीला महाराजांनी उजाळा दिला व सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले होते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी या बाबतीत महाराजांनी श्रीकृष्णाच्या लीला सांगितल्या व दहीहंडी फोडुन किर्तन सेवा झाली आणि महाप्रसाद व काल्याचा प्रसाद भाविकांना देण्यात आला
यावेळी गावात ह. भ. प. विजय महाराज बागडे व ह. भ. प. दादा महाराज सातपुते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी गावातील सर्व भाविक वारकरी गायक वादक मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते





