Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या खरा विकास करणारे भाऊ म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांना शेकडो महिलांनी...

खरा विकास करणारे भाऊ म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांना शेकडो महिलांनी बांधली राखी!!!

0
389
जामखेड न्युज——
   दोन वर्षांपासून कोणत्याही राजकीय पदावर नसताना कोट्यवधी रुपयांची पदरमोड करून अनेक प्रभागातील रस्ते, वीज व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड करण्यासाठी स्वच्छता अभियान लोकचळवळ बनवली, प्रभागात कचराकुंडी वाटप केले. यामुळे आज काटकर वस्तीवरील शेकडो महिलांनी आपला खरा विकास करणारा भाऊ म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांना राखी बांधली. 
   कोणत्याही पदावर नसताना जर रमेश दादा एवढे काम करू शकतात तर पदावर गेल्यावर ते अधिक जोमाने काम करतील म्हणून काटकर वस्ती जुना पाच नंबर प्रभाग नवा आठ नंबर मधील सुमारे २५० महिलांनी एकत्रीत येऊन भव्य दिव्य अशी रांगोळी काढली होती यात लिहिले होते की, आमचे रमेश दादा नगराध्यक्ष अशी रांगोळी काढली होती. हि रांगोळी सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. या महिलांनी रमेश दादा आजबे यांना राखी बांधली व भावी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी शुभेच्छा दिल्या. 
     रमेश (दादा) आजबे यांनी पदरमोड करत जिजाऊ नगर येथे बंदिस्त गटार बांधले रस्ता तयार केला. तसेच बीड रोड ते लोक. ना. होशिंग विद्यालयापर्यतचा अनेक वर्षांपासून बंद असलेला रस्ता खुला करत पेव्हिंग ब्लॉक बसवलेले हजारो विद्यार्थ्यांची सोय झाली.
ल. ना. होशिंग प्रवेशद्वारासमोर वृक्षारोपण करत झाडांना जाळी बसवली उन्हाळ्यात टँकरने पाणी घातले तसेच पंचायत समिती समोर झाडे लावून जाळी बसवली. अनेक ठिकाणी मुरमीकरण केले रस्ते, वीज व पाण्याची समस्या सोडवली. यामुळे रमेश दादाच आमचा विकास भाऊ म्हणून शेकडो महिलांनी आज आजबे यांना राखी बांधली. 

सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी या स्वच्छतेच्या कामात स्वतः ला झोकुन देत परिसरातील नागरिकांना एकत्र करून श्रमदानातून परिसर स्वच्छ केला आहे. रमेश आजबे यांनी आतापर्यंत पदरमोड करून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. स्वतःच्या गावाबरोबर मामाचे गावही लोकसहभागातून आदर्श केले बिनविरोध निवडणूका, मंदिराचा जीर्णोद्धार, अनेक ठिकाणी मुरमीकरण, पेव्हिंग ब्लाॅक, बंदिस्त गटारे, लाईट ची कामे, आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदळाचा तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजन पुरवठा केला मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले, ग्रामीण रूग्णालयात बोअरवेल घेतल्याने व मोटार बसविल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली. शहराच्या स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जावा शहर हिरवाईने नटावे याकरिता मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडे लावली झाडांना टॅंकरने पाणी घातले व संरक्षक जाळी बसवली त्यामुळे हरित जामखेड होऊ लागले आहे. प्रभाग वीस व पाच मध्ये अनेक कामे केली आहेत. सत्तेवर नसताना एवढी कामे केली त्यामुळे आमचे खरे विकास भाऊ रमेश आजबेच आहेत आमचे नगरसेवक व नगराध्यक्ष रमेश दादाच अशी रांगोळी काढत राखी बांधली व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!