जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
जामखेड ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांची नगर पदोन्नती झाली आहे तर त्यांच्या जागेवर डॉ. शशांक वाघमारे हे रुजू झाले आहेत या अगोदर आंबेजोगाई येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम केले तसेच केज उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते.

जामखेडला आल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या कोठारी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये त्यांनी भेट दिली आसता त्यांचा प्रतिष्ठान मार्फत सत्कार करण्यात आला यावेळी श्याम जाधवर, ज्ञानेश्वर कुमटकर हे उपस्थित होते.

सरकारच्या धोरणाप्रमाणे हर घर झेंडा घरघर झेंडा याचे सुद्धा कोठारी प्रतिष्ठानने वितरण करून लोकांना झेंडा लावून सहकार्य करण्याचे आवाहन केले. जामखेड ग्रामीण रुग्णालय मध्ये वैद्यकीय अधीकारी म्हणून डॉक्टर युवराज खराडे ,डॉक्टर शशांक शिंदे हे पण कार्यरत आहेत.

डॉक्टर शशांक वाघमारे यांनी या अगोदर केज ग्रामीण रुग्णालयामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केले आहे त्यामुळे कोठारी प्रतिष्ठान मार्फत येतोच सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉक्टर शशांक वाघमारे म्हणाले कोठारी साहेबांनी आमचा येथे सत्कार केला आम्हाला मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांनी सामाजिक कार्यासाठी कधीही आम्हाला हाक मारावी आम्ही सदैव तत्पर राहू