जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जामखेड शहरातील बाजारतळ येथुन एक मोटार सायकल चोरी गेलीली मोटारसायकल एका तासात मालकाच्या ताब्यात देण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे पोलीसांच्या कर्तव्यतत्परतेबद्दल सर्व सामान्य जनतेतून पोलीसांचे अभिनंदन होत आहे.
सविस्तर असे की जामखेड येथील प्रसिद्ध व्यवसाईक सुनील चोरडिया हे सकाळी १० वाजता बाजारातळ येथील भाजी बाजारात भाजी घेण्यास गेले. एका ठिकाणी आपली होंडा कंपनीची अॅक्टीवा क्रमांक MH 16 BQ 1559 गाडी उभी करून बाजार केला व पुन्हा गाडीकडे आले असता आपली गाडी चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळ शोधाशोध करून काही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला गाडी चोरी गेली असल्याचा अर्ज दिला.
यावरून जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन तत्काळ सुत्रे हालवत खाली पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ जाधव, व पोलीस काॅन्स्टेबल शिवलिंग लोंढे यांनी शहरातील विविध भागात शोध घेतला असता कुंभरतळे या ठिकाणी सदर गाडी रस्त्यातवर उभी असल्याचे आढळून आले. सदर गाडी गाडीचे मालक सुनील चोरडीया यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

चौकट
आगोदर गाडी चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला चार पाच चकरा माराव्या लागत होत्या पाच सहा दिवसांनंतर कुठे तक्रार दाखल करून घेतली जात होती. नंतर गाडीचा शोध तर लांबच राहत होता यामुळे पोलीसांच्या कामगिरी बद्दल प्रश्न निर्माण होत होते आता मात्र कर्तव्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.