जामखेड न्युज——
गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर असणारे ग्रामपंचायत सदस्यांपासून , दुधसंघाचे संचालक ते पंचायत समितीचे उपसभापती पदापर्यंत कारकीर्द यशस्वीपणे सांभाळणारे अंकुशराव ढवळे हे सर्व सामान्य जनतेशी नाळ जोडलेला अडीअडचणीसाठी अहोरात्र उपलब्ध असणारा नेता म्हणून ओळख आहे जवळा गटासाठी त्यांचे नाव प्रामुख्याने लोकांच्या मनामनात चर्चिले जात आहे.
परिसरात प्रचंड दुष्काळ पडला होता त्यावेळी अंकुशराव ढवळे यांनी दहा गावांसाठी चार छावण्या सुरू केल्या होत्या छावणीत जनावरांना जगवण्याबरोबर आदर्श सेवा दिली. छावणी पाहण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील हे केंद्रीय पथकाला घेऊन छावणीची पहाणी केली होती त्यावेळी उत्तम छावणी म्हणून शेरा दिला होता.
उपसभापती पदाच्या काळात तालुक्यात सुमारे १२००विहिरींना मंजुरी आणत त्या पुर्ण केल्या यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उंचाक झाला. सर्व कामे भ्रष्टाचार मुक्त केले. जवळा गटात डोणगाव सरहद्द ते जवळा साडेपाच कोटींचा रस्ता मंजुरी आणली. झिक्री बावीस, पिंपरखेड, गिरवली साडेसात कोटींचा रस्ता, अरणगाव ते जवळा साडेपाच कोटींचा रस्ता तसेच जवळा गटात जलयुक्त शिवार योजनेमध्ये बंधार्याचे जाळे निर्माण केले.
राजकारणात पहिल्या पासून विखे पाटील गटाचे समजले जातात लोकांच्या अडीअडचणीसाठी अहोरात्र झटणारे सर्व सामान्यांचा नेता म्हणून परिसरात त्यांची ख्याती आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ओबीसींसाठी राखीव आहे. जनतेतून अकुंशराव ढवळे ( भाऊ) यांची मागणी होत आहे. भाऊंनी उमेदवारी करावी असे साकडे मतदार करत आहेत.