जामखेड न्युज——
जामखेड नगरपरिषद प्रशासनाकडून जामखेड नागपंचमी यात्रेेची जय्यत तयारी सुुरू आहे. यात्रेला येणाऱ्या भाविक आणि नागरिकांसाठी शहरात ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारले जाणार आहेत अशी माहिती जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनीदिली.

जामखेड शहरात यात्राकाळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांनी शहरात अनेक ठिकाणी पार्किंगचे ठिकाणे निश्चित केले आहेत. तसेच नगरपरिषदेच्या वतीने शहरात 25 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमांतून यात्रेसाठी वेगाने नियोजन केले जात आहे.

यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अग्निशमन गाडी आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. पालखी मार्गातील अडथळे दुर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेगाने राबवल्या जात असल्याची माहिती जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.

जामखेड नागपंचमी आनंद मेळाव्यात तिकीटाचे दर काय असणार ? यावर बोलताना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते म्हणाले की, कर्जत यात्रेत वाढीव तिकीट दराचा मुद्दा गाजला होता, जामखेड यात्रेत तसा प्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणेच तिकीट दर आकारावेत जेणेकरून सामान्य माणसांना आनंद मेळाव्याचा आनंद लुटता येईल यासाठी आनंद मेळावा व्यवस्थापकांना तिकीट दराबाबत सुचना दिल्या आहेत. सरकारच्या करमणुक कर विभागाचे यावर बारकाईने लक्ष असणार आहे.
जामखेड शहरात होणाऱ्या नागपंचमी उत्सवात प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. वेगवेगळ्या ठिकाणी स्टेज देण्यात येणार आहेत, शहरात 25 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमांतून बॅरिगेट उभारण्यात येणार आहेत. यात्राकाळासाठी नगरपरीषदेकडून 22 स्वयंसेवकांची नियुक्ती होणार आहे. तसेच एनसीसीचीही मदत घेतली जाणार आहे. शहरातील सर्व रूटची तपासणी झाली आहे. आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे असे दंडवते म्हणाले.
गर्दीच्या वेळी अपप्रवृत्तींमुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी cctv आणि लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. थिल्लरपणा करणारांवर पोलिस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नागपंचमी यात्रेचा मोठ्या प्रमाणात आनंद घ्यावा असे अवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड न्युजशी
बोलताना केले.
जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची यात्रा श्रावण शुद्ध पंचमीला आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी हजेरी लावत असतात परंतू कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे यात्रा होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा होत असलेल्या यात्रेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. यंदा यात्रेत गर्दीचा उच्चांक होऊ शकतो. त्यादृष्टीने तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.जामखेड नगरपरिषदेच्या सहकार्यातूून जामखेेड पोलिस दलाने जामखेड शहरात सुरक्षीततेच्या उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे.
नागपंचमी यात्राकाळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, गुंड प्रवृत्तीच्या तत्वांकडून यात्रेला गालबोट लावले जाऊ नये, नागरिकांना निर्भयपणे यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी यात्रेतल्या प्रत्येक गोष्टींवर जामखेड पोलिसांची विशेष नजर असणार आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 25 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमांतून जामखेड पोलिसांची यात्रेवर बारकाईने नजर असणार आहे. याशिवाय साध्या वेशातील पोलिस, पोलिस मित्र गर्दीच्या ठिकाणी गस्त घालताना दिसणार आहेत.
यात्राकाळात नागरिकांना कुठलीही मदत तात्काळ मिळावी याकरिता शहरात सात ठिकाणी पोलीस चौक्या कार्यान्वित होणार आहेत. सात पोलिस अधिकारी, 100 पोलिस कर्मचारी, होमगार्ड जवान, पोलिस मित्र तसेच विशेष पोलिस पथक तैनात असणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.