जामखेड न्युज——
राष्ट्रसंत आनंदॠषी महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या समाजाला प्रेरणादायी ठरतील. शांतता, संयम व नम्रता या गुणांचे आपण अनुकरण केले तर आपणासही काहीही कमी पडत नाही. महाराजांच्या विचारांवरच आनंदॠषी हॉस्पिटलचे काम सुरू आहे. यामुळे गोरगरीब जनतेला माफक दरात आरोग्य सेवेचा फायदा मिळत आहे असे मत माजी मंत्री व आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

सकल जैन समाजाच्या वतीनेआनंदॠषी महाराज यांची १२२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर दोन्ही आमदार प्रथमच एकाच वेळी एकत्र आले होते. दोघांनीही संतांच्या विचारांविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, आचार्य आनंदॠषी महाराजच्या जन्मगावी गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा मिळते. आचार्य आनंदॠषी महाराजांनी सामान्य लोकांना समजेल असे ज्ञान दिले. देशभरात भ्रमंती केली. आजही समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी संतांचे विचारच प्रेरणादायी ठरतात. पुढील पिढीला संतांचे विचार समजावेत म्हणून अशा कार्यक्रमाची खरोखरच गरज आहे.

या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पिंटू ( शेठ) बोरा,
सुर्यकांत मोरे, अशोक बोरा, किशोर पितळे, अशोक कोठारी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल, विजय कोठारी, रमेश कटारिया, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, रमेश गुगळे, दिलीप बाफना, प्रविण चोरडिया,
गोरख धनवट, अशोक बाफना, सुनील कोठारी, पवन राळेभात, अमित चिंतामणी, अमोल गिरमे, शरद कार्ले, मनोज कुलकर्णी, सोमनाथ पाचरणे, पोपट राळेभात, तात्याराम पोकळे, राहुल बेदमुथ्था, मोहन पवार, महेंद्र बोरा, राहुल उगले, प्रलेश बोरा, अशोक शिंगवी, शितल शिंगवी, अभय शिंगवी, विकास राळेभात, विनोद बेदमुथ्था, प्रशांत बोरा, विनोद बोरा, गणेश भळगट, सुमीत चांनोदिया, रविंद्र छाजेड, पकंज भंडारी, योगेश भंडारी, केतन भंडारी, महेश भंडारी, अजय कोठारी, विजय बोगावत, तेजस बोरा, संजय बोरा, दिलीप नहार, आशिष चोरडिया, अभय बाफना, संपत बोरा, अशोक गांधी, अभय बोरा, संतोष चोरडिया, जितेंद्र गुंदेचा, संदेश कोठारी, सुमतीलाल बोथरा, आकाश बाफना, आशुतोष छाजेड, निलेश भंडारी, कांतीलाल खिवंसरा, विनोद नवले, प्रविण सानप, सुशील बेदमुथ्था, मंगेश बेदमुथ्था, भक्ती संध्या कार्यक्रमाचे गायक अन्शुल कोठारी, नितीन बाफना, महावीर बाफना, महेश कटारिया, संदीप भंडारी, चेतन सुराणा, सुयश बोथरा, तुषार बोथरा, मनोज बोथरा यांच्या सह कर्जत, करमाळा, आष्टी, पाटोदा, नान्नज, जवळा, पाटोदा, कडा सह परिसरातील जैन श्रावक संघाचे पदाधिकारी माता भगिनी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, आनंदॠषी महाराजांनी समाज जोडण्याचे काम केले. मानवता धर्म शिकवला.









