जामखेड न्युज——
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या भेटी घेताना चित्र पहायला मिळत आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही शिंदे यांची भेट घेतली आहे. रोहित पवार यांनीच या भेटीचे दोन फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत.

रोहित पवार यांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास केलेल्या ट्विटमधून या भेटीची माहिती दिली आहे. रोहित यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ते शिंदेंसोबत चर्चा करताना दिसत आहेत.

या फोटोला कॅप्शन देताना रोहित यांनी, “मतदारसंघासह विविध विषयांवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.” असं म्हटलं आहे.