जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
तालुक्यातील फक्राबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास ९९ लाखांचा निधी उपलब्ध झाला असून यासाठी फक्राबाद चे सरपंच विश्वनाथ राऊत यांनी गेल्या ८ वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा करत होते पण यश मिळत नव्हते. आमदार रोहित पवार यांनी यात लक्ष घातले व ताबडतोब निधी उपलब्ध झाल्याने सरपंच विश्वनाथ राऊत व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. व आमदार रोहित पवार यांचे विशेष आभार मानले.
सरपंच विश्वनाथ राऊत यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या 8 वर्षांपासून मंजूर असून देखील निधी अभावी रखडले असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यानुसार आमदार रोहित पवार यांनी २५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रास निधी उपलब्ध करण्याबाबत पाठपुरावा केला आमदार रोहित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्या कामासाठी ९९ लाखांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती फक्राबाद चे सरपंच विश्वनाथ राऊत यांनी दिली.
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे गेल्या ८ वर्षापासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर होऊन देखील त्यासाठी निधी उपलब्ध झाला नव्हता, त्यावेळेस माजी मंत्री राम शिंदे यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात पाठपुरावा केला पण या प्रश्नाकडे माजी मंत्री राम शिंदे यांनी दुर्लक्ष केले होते. मागील युती सरकारच्या काळात पाच वर्ष हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भिजत घोंगडे राहिले होते. परंतु आमदार रोहित पवार हे निवडून येताच या कामाबाबत मी जातीने लक्ष घालून हा प्रश्न कायमचा मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले होते.
परंतु गेल्या एक वर्षाच्या कोरोना संकटा मुळे जिल्हा नियोजन ची बैठक झाली नसल्याने हे काम रखडले होते. परंतु २५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकी त्या प्राथमिक उपकेंद्रास तातडीने निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी आमदार पवार यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या केली होती.त्या मागणीची जिल्हा नियोजन दाखल घेत त्यास ९९ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. आठ गावांना याचा फायदा होणार आहे ती गावे पुढीलप्रमाणे आहेत. फक्राबाद, डिसलेवाडी, वंजारवाडी, खांडवी, धानोरा, बावी, खामगाव व पिंपरखेड आदी गावे आहेत.
निधी मंजूर होताच सरपंच विश्वनाथ राऊत व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.