Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा शहीद जवानांना मानवंदना

जामखेडमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा शहीद जवानांना मानवंदना

0
274

 

जामखेड प्रतिनिधी

                   जामखेड न्युज——

कारगिल मध्ये भारतीय सैन्यांनी सर्वोच्च पराक्रम दाखवल्यामुळे विजय संपन्न झाला शहीद जवानांना मानवंदना देऊन कारगिल विजय दिनानिमित्त एनसीसी रॅली आयोजन करण्यात आले.

जामखेड तालुका माजी सैनिक संघटना आजी-माजी सैनिक व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अ.नगर च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जामखेड तहसीलदार, योगेश चंद्रे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ ,कृषी अधिकारी सुपेकर , शहीद गणेश भोसले यांचे माता- पिता कृष्णाजी भोसले व शोभा भोसले, प्राचार्य श्रीकांत होशीग, प्राचार्य नरके ,प्राचार्य मडके बी के, नगरसेवक अमित चिंतामणी, शरद कार्ले, मंगेश आजबे, माजी सैनिक संघटना संस्थापक बजरंग डोके, अध्यक्ष दिनकर भोरे, उपाध्यक्ष नानासाहेब बाबर, कार्याध्यक्ष रावसाहेब जाधव, सचिव अंकुश जगदाळे, खजिनदार शिवाजी साळवे,
एनसीसी ऑफिसर गौतम केळकर, अनिल देडे ,मयूर भोसले, अंगद कोल्हे, सुभाष ढगे अरविंद जाधव, योगेश कोल्हे, संतोष कदम, शिवाजीराव चव्हाण ,शिवाजी गाडेकर, धर्माधिकारी, काशिनाथ पवार, कचरू घोडके, अरुण अडाले, दनाने मेजर ,सुखदेव शिंदे ,कारले मेजर,पावन राळेभात, लहुराज पवार , प्रा दादा ठाकरे, शिंदे बी एस ,विजू शेठ कोठारी, हज्जूभाई सुभेदार, ग्रामस्थ व्यापारी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जामखेड शहरात सैनिक स्मारक या ठिकाणी शहिदांना आदरांजली वाहून मानवंदना देण्यात आली.
तहसील कार्यालय, पोलीस विभाग, नगरपरिषद ,कृषी विभाग एनसीसी विभाग, ग्रामस्थ यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मनोगत मध्ये भारतीय सैन्य विषयी आम्हाला आदर असून त्यांच्या कार्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत व ते देशाचे संरक्षण करतात त्यांच्या मदतीसाठी आपण सर्वांनी तत्पर असले पाहिजेत व सर्व प्रशासकीय अधिकारी आम्ही सैनिकांच्या मदतीसाठी आहोत असे मनोगत व्यक्त केले व शहिदांना आदरांजली वाहिली .

17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी रॅलीचे उद्घाटन तहसीलदार योगेश चंद्रे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कारगिल विजय दिनाचा विजय असो, जय जवान जय किसान, भारतीय सेनेचा विजय असो ,भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणेने संपूर्ण जामखेड शहर दुमदुमून निघाले.

कारगिल विजय दिनाच्या रॅलीचे समस्त जामखेडकरांनी स्वागत केले.
रॅलीमध्ये जामखेड महाविद्यालय जामखेड, लना होशीग विद्यालय,रयतचे श्री नागेश विद्यालय जामखेडचे एनसीसी कॅडेट सहभागी होते. कारगिल विजय दिवस अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे तर आभार प्रदर्शन मयूर भोसले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!