जामखेड न्युज——
लाक्षणिक उपोषण माघे घेण्याबाबत दिलेले लेखी आश्वासन देऊन गुन्हा न दाखल करून मुख्याधिकारी यांनी फसवणूक केल्याने त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब बडतर्फ करण्यात यावे अन्यथा जामखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करून उपोषण करण्यात येईल . व यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड तालुकाध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड कॉर्नर ते नवीन पोलीस स्टेशन रोडवरील जिओ कंपनीने नगर परिषदेची कसलीही परवानगी न घेता अनाधिकृत पणे रोडच्या साईडला जिओ कंपनीचे पोल उभे करून अनाधिकृत बांधकाम करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता त्या विरोधात सदर जिओ कंपनी विरोधात गुन्हा दाखल व्हावा या करिता आम्ही दि. २५/२/२०२२ रोजी उपोषण केले होते. त्यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी आम्हाला गुन्हा दाखल करण्यासंदर्भात लेखी आश्वासन देखील दिले होते. परिणामी आम्ही आमचे उपोषण मागे घेतले होते. परंतु यामध्ये नक्कीच मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला असावा म्हणून आजपर्यंत सदर कंपनीवर कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही.

तसेच उपोषणातील दुसरा मुद्दा होता की, महिलांसाठी बाजारतळावर शौचालय बांधण्यात यावे, पण हे देखील अजून बनवण्यात आलेले नाही, तसेच बीड कॉर्नरच्या मुतारीचे देखील अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. या सर्व मागण्या मान्य करत त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देऊन देखील जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी आम्हाला जिओ कंपनीवर गुन्हा दाखल केलेला नसल्याने त्यांनी आमची व सर्व जामखेड मधील जनतेची फसवणूक केलेली आहे. तरी वरील संदर्भात लेखी आश्वासन देवून गुन्हा दाखल केला नसल्याने मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब बडतर्फ करण्यात यावे अन्यथा जामखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करून उपोषण करण्यात येईल . व यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुकाध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी दिला आहे.