जामखेड तालुक्यात आखाड पार्ट्या जोरात चिकन मटन मासे यांना मागणी वाढली

0
212
जामखेड न्युज——
आखाड (आषाढ) महिन्यात मांसाहाराला प्राधान्य दिले जाते बुधवार (ता. 28) पासून श्रावण महिना सुरू होत असल्याने माणसावर प्रेमींनी आपला मोर्चा गावरान कोंबड्या, चिकन, मासे व अंड्याकडे वळविल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातही दिसून येत आहे त्यामुळे चिकन, मासे, मटण गावरान कोंबड्यांना मागणी वाढली आहे. अनेक गावात सध्या जत्रा मोठ्या उत्साहात सुरू आहेत. यामुळे आखाड जोरात आहे. 
गावरान कोंबड्यांना मागणी वाढली
मागील दोन वर्षापासून कोरोन निर्बधामुळे निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे यात्रा कमी प्रमाणात व कमी लोकांचे उपस्थिती पार पडल्या होत्या परंतु आता त्या प्रकारचे वातावरण नसल्याने यात्रा मोठ्या प्रमाणात व उत्साहात होत असल्यामुळे गावरान कोंबड्यांना मागणी वाढली आहे.
सध्या गावरान कोंबड्यांची आवकही चांगली आहे व त्यांना मागणी होत आहे आषाढातील धार्मिक कार्यक्रमांना कोंबड्यांना मागणी वाढते.
सध्या दोन ते अडीच किलोचा कोंबडा 400 ते 600 रुपयांना तर दीड ते दोन किलोचा कोंबडा 450 ते 500 रुपयांना विकला जात आहे.
बहुतांश नागरिक श्रावणात मांसाहार वर्ज करतात त्यामुळे आकाडाच्या शेवटची टप्प्यात मांसाराला मागणी वाढते. मटन, चिकन, मासे, अंडी खरेदी करण्यासाठी मंगळवार, शुक्रवार, व रविवारी बाजारात गर्दी होताना दिसत आहे. शिवाय गावरान कोंबड्यांना इतर वेळेपेक्षा यावेळी मागणी वाढली आहे.
चिकनचे दर कमी झाल्याने आषाढात चिकन प्रेमींना दिलासा मिळाला आहे.महिनाभरापूर्वी 250 ते 260 रुपयेपर्यंत गेलेले चिकनचे दर सध्या 180 ते 200 रुपये पर्यंत उतरले . त्यामुळे चिकन खवय्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. माशाचे दर ही स्थिर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here