ल. ना. होशिंग विद्यालयात मानक क्लबची स्थापना

0
288

जामखेड न्युज——

 

 

     येथील ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड येथे “मानक क्लब” BUREAU OF INDIAN STANDARD चे उदघाटन दि. २० रोजी विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री. होशिंग साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व नंतर मान्यवरांच्या हस्ते क्लब मधील इयत्ता नववी ते बारावी मधील 50 सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यालयातील मानक क्लब चे सचिव श्री. घोडेस्वार आर. एस. सर यांनी मानक क्लब ची सखोल ओळख व माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. जगदाळे साहेब व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. अडसूळ साहेब यांनी BIS चे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री. होशिंग साहेब यांनी विद्यार्थ्यांना BIS चा ज्ञानाचा वापर स्वतःसाठी न ठेवता तो समाजामधील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे काम आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपले हे कर्तव्य आहे. हे समजावून सांगितले.

 

 

या कार्यक्रम प्रसंगी अध्यापक एन. सी. सी. ऑफिसर श्री. देडे सर, श्री. पोले सर श्री. भोसले सर, श्री . देशमुख सर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देडे सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार श्री. पोले सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here