जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——-
परीसरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या शिखरावर पोहचलेल्या मान्यवरांना तात्यासाहेब देशमुख पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा कै. ल. रा. देशमुख उर्फ तात्यासाहेब देशमुख पुरस्कार मराठीचे गाढे अभ्यासक व
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांना नुकताच पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्याचबरोबर विद्यार्थी व समाज यांच्या विकासासाठी आणि समाजसेवेसाठी सातत्याने काम करणारे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांचा या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी माननीय श्रीराम रानडे राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त शिक्षक यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी.आर.देशमुख, शिक्षण तज्ञ अ.ल.देशमुख व शिक्षणाधिकारी श्री पोपटराव काळे साहेब पुणे,माजी मुख्याध्यापक जी.एल. देशमुख , दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेडचे उपाध्यक्ष अरुणशेठजी चिंतामणी, सचिव श्री शशिकांत देशमुख, खजिनदार श्री राजेशजी मोरे , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्रीकांत होशिंग यांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत आदर्श प्राचार्य म्हणून नावलौकिक मिळवला आहे. तसेच त्यांचा मराठी विषयाचा गाढा अभ्यास आहे. मराठी कृतीपत्रीका वर त्यांचे पुस्तकही आहे. मराठी व्याकरण विषयावर त्यांचे अनेक ठिकाणी मार्गदर्शन असते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, अशोक शिंगवी सह सर्व संचालक मंडळ श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे, भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. एन पारखे, न्यू इंग्लिश स्कूल राजुरीचे मुख्याध्यापक जुल्फिकार पठाण, ल. ना. होशिंग विद्यालयाचे उपमुख्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसुळ सह सर्व कर्मचारी वृंद तसेच जामखेड मिडिया क्लबचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.