जामखेड न्युज – – – –
राजकुमार दिवाण ऊर्फ केडी यांचे चिरंजीव कै. अनुपम दिवाण यांचे थॅलेसीमिया या आजारामुळे १८ वर्षापूर्वी निधन झाले होते. थॅलेसेमिया आजारामध्ये रुग्णास रक्ताची अत्यंत गरज भासते. आपल्या मुलाचे निधन झाले यास खचून न जाता, अनेक थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी सलग १८ वर्ष राजकुमार दिवाण व साै.गुलशन राजकुमार दिवाण या दाम्पत्यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून चांगला आदर्श समाजासमोर ठेवला आहे. तरी येत्या शनिवारी ६ मार्च २१ ला सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत. शुभ मंगल कार्यालय केडी डिपार्टमेंटल स्टोअर शेजारी, भिडे चौक, सावेडी अहमदनगर येथे शिबिरा मध्ये जास्तीत जास्त रक्त दात्यांनी आपले रक्तदान करून समाजसेवेच्या या व्रत्तास हातभार लावावा अशी विनंती दिवाण परिवाराने केली आहे