जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट )
वेळोवेळी कळवून तसेच नगरपरिषदेच्या समोर बोर्डावर नावे जाहीर करूनही नगरपरिषदेचे विविध टॅक्स ( कर) न भरणाऱ्या करदात्यांच्या घरासमोर नगरपरिषदेच्या वतीने डफली बजावो कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यातून दिवसा आखेर घरपट्टी -१५२३३६ व पाणीपट्टी ७३२९७ मिळून २ लाख २५ हजार ६३३ रूपये आशी वसूली करण्यात आली आहे. आज दि. २ मार्च रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी डफली बजावो कार्यक्रम सुरू केला असून ते स्वतः कर्मचाऱ्यांसोबत फिरत आहेत. यामुळे कर न भरणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले असून करदात्या कर भरण्यास सुरूवात केली आहे.
देशात आलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने नागरिकांना काही महिने येतील त्यापध्दतीने कर भरण्याची सवलत दिली होती. मात्र लाॅकडाऊन नंतर व्यवहार सुरळीत झाल्यानंतरही करदाते कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे नगर परिषद प्रशासनाला कर्मचारी वेतन, पाणीपुरवठा पाईपलाईन दुरूस्ती, दिवाबत्ती व्यवस्थेसह वेगवेगळ्या कामासाठी आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते होते. कर्मचाऱ्यांना तर वेतन मिळावे म्हणून अंदोलनही करावे लागेल होते. या सर्व पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने विविध पध्दतीने सुचना करूनही करदाते कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने नगर परिषदेने आज त्यांच्या घरापुढे डफली बजावो कार्यक्रम सुरू केला आहे. याबरोबरच नागरिकांना कारवाईची वाट न पाहता टॅक्स भरावा असेही आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.
नागरिकांनी वेळच्यावेळी कर भरल्यास नगरपरिषद नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. विजेची पोलची अडचणी सोडवणे तसेच उघड्यावरील गटारे बंदिस्त करणे हे काम चांगल्या प्रकारे करता येते. त्यामुळे चांगल्या सुविधेसाठी वेळेवर कर भरावा असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.
चौकट
थकबाकीदारांची नावे बोर्डावर लावुनही हवी तशी वसुली होत नव्हती तेव्हा थकबाकी दाराच्या घरासमोर जाऊन डफली बजावो कार्यक्रम केल्याने आज दिवसभरात सव्वा दोन लाख रुपये वसुली झाली हा कार्यक्रम पुढे काही दिवस सुरूच राहील असे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.