जामखेड प्रतिनिधी
येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने कवी कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा दिन सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्ते प्रा.मधुकर राळेभात यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. विद्या काशीद यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी भाषणात डॉ. विद्या काशीद यांनी कुसुमाग्रजांची थोरवी सांगून आपली मातृभाषा मराठीला संतांच्या विचारांची समृद्ध परंपरा असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांची ‘ कणा ‘ कविता वाचून दाखविली व त्यावर बोधपर भाषण केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी आ. य. पवार यांची ‘विज्ञान ‘ कविता नांदेड विद्यापीठाचे पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल उपस्थित कवींच्या वतीने प्रा. पवार व सौ. सुमनताई पवार यांना शाल ,श्रीफळ देऊन प्रा. राळेभात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कोरोना बंधनामुळे छोटेसे कवी संमेलन संपन्न झाले. कवी कुंडल राळेभात, डॉ.संजय राऊत, कवी रंगनाथ राळेभात, डॉ. जतीनदास काजळे यांनी सामाजिक व निसर्ग विषयावरील आपल्या कवितांचे वाचन केले. सौ शोभाताई काशीद, सौ मंजुषा काजळे, डॉ. सविता राऊत यांच्या हस्ते काव्य दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. मोहनराव डुचे यांनी उपस्थितांचे आभार मानले.