जामखेड न्युज——
सैनिक व पत्रकार दोघेही देशासाठी खुप मोठे योगदान देतात दोघेही देशसेवाच करतात सैनिक सीमेचे रक्षण करतात तर पत्रकार हे देशातील वाईट प्रवृत्ती च्या व्यक्तींना उघड करतात समाजाचा आरसा म्हणून काम करतात. दोघांमुळे सर्वसामान्य जनता निर्धास्त आहे असे प्रतिपादन माजी सैनिक बजरंग डोके यांनी व्यक्त केले.

जामखेड तालुका मिडिया क्लबच्या नुतन पदाधिकार्याचा आज दि. १५ रोजी सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग डोके, संघटनेचे अध्यक्ष दिनकर भोरे, उपाध्यक्ष नानासाहेब बाबर, कार्याध्यक्ष रावसाहेब जाधव, सचिव अंकुश जगदाळे, खजिनदार शिवाजी साळुंके, संघटनेचे सदस्य सुखदेव शिंदे, संतोष कदम, सुभाष ढगे, शिवाजी गाडेकर, महेंद्र राळेभात, जयसिंह डोके, दिलीप कोल्हे,अखील शेख,सुदाम शिंगटे, सुर्यकांत खर्डे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, सहसचिव पप्पूभाई सय्यद, रोखठोक न्यूजचे संपादक अविनाश बोधले, विश्वदर्शन न्यूजचे किरण रेडे, अजय अवसरे यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी सैनिक बजरंग डोके म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सैनिकांच्या अडीअडचणी विषयी काम करत आहोत. यात पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. समाजाचा पत्रकार व सैनिक यांच्यावर विश्वास आहे. आम्ही आता कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. सर्व समाजाला या गोष्टी समजाव्यात हा कार्यक्रम समाजाचा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांनी सांगितले की, समाज घडविण्याचे काम सैनिक, शिक्षक व पत्रकार हेच करू शकतात.
यावेळी अविनाश बोधले, सुदाम वराट यांनी आपले विचार व्यक्त केले.