जामखेड न्युज——
जामखेड येथील रिक्षा चालकाने रिक्षात विसरलेल्या पैशाची व सोन्याचे दागिने असलेली पिशवी जामखेड पोलीसांच्या मदतीने मुळ मालकाला परत केली यामुळे रिक्षा चालक सादिकभाई शेख यांचा माजी मंत्री प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी रिक्षा चालकाच्या घरी जाऊन सत्कार केला.

जामखेड येथील रिक्षाचालक सादिकभाई शेख यांच्या रिक्षा मध्ये शिवाजीनगर येथील महीला प्रवासी सुनिता हजारे यांचं पैसे व सोन्याचे दागिने सापडले होते ,त्यांनी ते परत केले,त्यांच्या प्रामाणिकपणा मुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

एक रिक्षा वाला आपल्या हिमतीवर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. आणि आता जामखेड मधील रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. विविध मान्यवरांनी घरी जाऊन रिक्षा चालकाचा सत्कार केला आहे.
आमदार रोहित पवारांनी रिक्षा चालकाच्या घरी जाऊन सत्कार केला यावेळी आसिफ शेख, आवेश शेख, फय्याज कुरेशी, अझहर खान, प्रकाश त्रिभुवन, राजेंद्र फडतरे, कय्युम शेख, आसीर बागवान, अशफाक शेख यांच्या सह अनेक रिक्षा चालक उपस्थित होते.
तसेच माजी पालकमंत्री आमदार प्रा राम शिंदे केला यावेळी रिक्षा चालक युनीएन जामखेड अध्यक्ष,ते अल्पसंख्या मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सलिम भाई बागवान नगरसेवक अमित चिंतामणी, प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगंडे सह सर्व रिक्षा चालक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
कर्जत जामखेड मतदारसंघाला दोन आमदार मिळाले आहेत आता विकासकामे करण्यासाठी दोन्ही आमदारांची स्पर्धा सुरू होईल यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले कामे मार्गी लागतील व थोड्याच दिवसात मागासलेला मतदारसंघ अशी असलेली ओळख पुसून एक विकसित मतदारसंघ म्हणून ओळखला जाईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे.