आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या अतिरिक्त फायद्यासाठी सर्व ल.पा बंधाऱ्यांची उंची वाढवण्यात येणार!

0
226

 

जामखेड न्युज——

 

मतदारसंघातील पाण्याची अडचण कायमची सोडवण्यासाठी व शेतकऱ्यांना पुरेसे व मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार रोहित दादा पवार यांनी वेळोवेळी आवश्यक ते प्रयत्न केले व त्याला यश देखील आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता जामखेड उपविभागीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व लपा तलावांची उंची वाढवण्याच्या बाह्य अभिकरणाद्वारे सर्वेक्षण करण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

 

 

जलसंपदा अंतर्गत येणारे सर्व बंधाऱ्यांची उंची वाढवून तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा अतिरिक्त फायदा करून देणे हा या मागचा मूळ उद्देश असून कुठल्याही शेतकऱ्याची अतिरिक्त जमीन जाणार नाही याची पण काळजी घेतली जाणार आहे. यामध्ये नायगाव लपा तलाव, रत्नापुर लपा तलाव, तेलंगशी लपा तलाव, धोंडपारगाव लपा तलाव, धोत्री लपा तलाव, जवळके लपा तलाव, खैरी मध्यम प्रकल्प यांची उंची वाढवण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला असून या सर्वेक्षणाचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर संबंधित तळ्याची व बंधाऱ्याची उंची वाढवून घेण्यात येणार आहे. याचा थेट शेतकऱ्यांना फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

 

 

दरम्यान, मतदारसंघात पाण्यासंदर्भातील अडचण असो किंवा इतर कोणत्याही समस्या असो आमदार रोहित दादा हे कायमच वैयक्तिकरित्या लक्ष देऊन सर्व कामे मार्गी लावतात आणि शासन दरबारीही ते वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा करतात. त्यामुळेच मतदारसंघात सध्या अनेक विकास कामे मार्गी लागली असून बरीच कामे प्रगतीपथावर असल्याचेही दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here