शिक्षक पात्रता परीक्षेत (TET)राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबातील उमेदवाराला 15 गुणाची सवलत

0
225
जामखेड न्युज——
शिक्षक पात्रता परीक्षेत (TET)राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबातील उमेदवाराला 15 टक्के गुणांची सवलत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश परीक्षा परिषदेला देण्यात आले आहेत.  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत टीईटी परीक्षा घेण्यात येते.
या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 60 टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या आणि विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग आणि अपंगांना पाच टक्के गुणांची सवलत म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी 55 टक्के गुण आवश्यक आहेत.  
माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबातील सदस्य यांना समांतर आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here