[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
जामखेड न्युज——
गेल्या पाच दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. रात्रीपासून सुरू झालेला पाऊस दिवसभरही सुरूच होता यात आज गुरूपोर्णिमा गुरू प्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी चक्क पावसात भिजत शाळेत आले. याचे शिक्षकांनीही मोठे कौतुक वाटले. शाळेत येऊन गुरूप्रती आदर व्यक्त केला.

यावेळी शाळेत राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, विजयकुमार हराळे, अतुल दळवी, आश्रू सरोदे, लक्ष्मी वराट, सुजाता वराट, तनुजा वराट, सानिका वराट, प्रतिक्षा अवटे, प्रणिती मुरूमकर, हरिश अडसुळ, सार्थक वराट, प्रतिक वराट, प्रदिप वराट, सौरभ वराट, शिवम मुरूमकर, दक्षय मोरे, योगेश राक्षे, कृष्णा लहाने यांच्या सह अनेक विद्यार्थी हजर होते.

आपल्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते. शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणून विद्यार्थी पावसात भिजत शाळेत आले.

गुरु आपल्या जीवनाला दिशा देण्याचे काम करणारे म्हणजे अशी व्यक्ती जो आपल्याला अज्ञान आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर करतो आणि आपल्याला ज्ञान आणि जागरूकता प्रदान करतो.
गुरु पौर्णिमा हा आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक हिंदू सण आहे. संत वेदव्यास यांच्या जन्माच्या स्मरणार्थ दरवर्षी हा सण साजरा केला जातो.आई-वडील, आजी-आजोबा आणि आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. यांची या दिवशी पूजा केली जाते. त्यांचे अभिनंदन केले जाते. म्हणून विद्यार्थी भर पावसात भिजत शाळेत आले.