जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पारधी समाजातील पाचवीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेल्या मुलांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे. याबरोबरच जामखेड तालुक्यातील सध्या पोलीस सेवेमध्ये असलेले त्यांचे मुलगा मुलगी नातू पती-पत्नी बहीण व इतर नातेवाईक तसेच गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) जवानांचे पती-पत्नी, मुलगा – मुलगी व इतर नातेवाईक यांनाही रोजगाराची संधी उपलब्ध असणार आहे. या संधीचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.

या बाबत जामखेड न्युजशी बोलतानापोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की, वरील समाज घटकातील व शासकीय लोकसेवक यांचे नातेसंबंधातील पाचवी ते डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असे शिक्षण ज्यांचे असेल त्यांनी १७ जूलै या तारखेला नगर येथे रोजगार मेळाव्यात हजर राहायचे आहे.

त्यापूर्वी आपल्या जामखेड पोलीस स्टेशनला येऊन एक ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे. किंवा स्वत जरी फार्म भरला तरीही चालेल. विविध क्षेत्रातील ७४ किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत. आणि तेथे उपस्थित पाचवी, १० वी, १२ वी, डिप्लोमा ते ग्रॅज्युएशन, अथवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेल्या मुलां-मुलींना नोकरीची संधी देणार आहेत. तरी वरील पात्रता धारक अशा सर्वांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. सदर ठिकाणी इंटरव्यू झाल्यानंतर तात्काळ तुम्हाला नोकरीला लागले बाबत प्रमाणपत्र किंवा नेमणूक केली असल्याचे ऑर्डर दिली जाणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.





