प्राचार्य श्रीकांत होशिंग यांना कै. लक्ष्मण रामचंद्र देशमुख पुरस्कार जाहीर रविवार दि. १७ रोजी पुण्यात वितरण

0
277
जामखेड न्युज——

परीसरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या शिखरावर पोहचलेल्या मान्यवरांना तात्यासाहेब देशमुख पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा  कै. ल. रा. देशमुख उर्फ तात्यासाहेब देशमुख पुरस्कार मराठीचे गाढे अभ्यासक व ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांना जाहीर झाला आहे. रविवार दि. १७ रोजी पुण्यात वितरण होणार आहे. पुरस्कार जाहीर होताच होशिंग यांच्या वर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. 

कै. लक्ष्मण रामचंद्र देशमुख यांचा स्मृतिदिन रविवार दिनांक 17 जुलै 20 22 रोजी दुपारी दोन ते चार या वेळात गोपाळ हायस्कूल सदाशिव पेठ देशमुख वाडी येथे आहे यानिमित्ताने आपण जामखेड मधील एका कर्तुत्ववान व्यक्तीचा गौरव करतो यावर्षी श्रीकांत बाळकृष्ण होशिंग यांचा करणार आहोत यापूर्वी हा कार्यक्रम जामखेड येथे होत होता गेल्या वर्षीपासून हा कार्यक्रम पुण्यात करतो आपण या कार्यक्रमास यावे ही विनंती देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. 
 
    श्रीकांत होशिंग यांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत आदर्श प्राचार्य म्हणून नावलौकिक मिळवला आहे. तसेच त्यांचा मराठी विषयाचा गाढा अभ्यास आहे. मराठी कृतीपत्रीका वर त्यांचे पुस्तकही आहे. मराठी व्याकरण विषयावर त्यांचे अनेक ठिकाणी मार्गदर्शन असते. 
 पुरस्काराची घोषणा होताच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक, संस्थेचे कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here