जामखेड न्युज——
केज तालुक्यातील चिंचोली – माळी येथील पांडुरंग नामदेव राऊत व त्यांच्या पत्नीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली असून यामध्ये पांडुरंग राऊत यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहेत.

तालुक्यातील चिंचोली माळी येथील पांडुरंग राऊत (55) व त्यांच्या पत्नी ह्या वरपगाव कडे जाण्याऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या रस्त्यावर राहतात. दरम्यान दि. 11 जुलै रोजी सायंकाळी सात ते साडेसात च्या वाजेच्या सुमारास त्याठिकाणी कांही अज्ञात लोक आले व पांडुरंग राऊत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओडू लागले. त्यावेळी पांडुरंग राऊत यांनी आरडाओरड केली असता सदर ठिकाणची लाईट बंद करून अज्ञातांनी पांडुरंग राऊत यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या पत्नी शशिकला राऊत यांच्यावरही हल्ला केला त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

सदर घटना घडल्यानंतर जखमींना तात्काळ केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले परंतु डॉक्टरांनी पांडुरंग राऊत यांनी मृत घोषित केले. तर शशिकला राऊत यांच्यावर उपचार सुरु आहेत.दरम्यान सदर घटनेने खळबळ माजली असून घटनास्थळी पीएसआय वैभव सारंग व पोलीस नाईक राजू गुंजाळ हे दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी केल्याची माहिती देण्यात आली. सदरील हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.