जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
आषाढी एकादशीच्या दिवशी प्रति पंढरपूर व धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठलाची पूजा करण्याचा मान सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांना सपत्नीक मिळाला.

दोन वर्षाच्या कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर प्रथमच आषाढी यात्रा धनेगाव येथे मोठ्या उत्साहात भरण्यात आली होती हजारो भाविक भक्त विठू नामाचा गजर करीत धनेगाव येथील मंदिरात रांगेत दर्शन घेऊन विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष करीत दर्शन घेत होते. वंचित बहुजन आघाडीचे ॲड. अरुण जाधव यांनी प्रथमच संविधान समता दिंडीचे आयोजन केले होते त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला होता, त्याचबरोबर गेल्या १६ वर्षापासून जामखेड येथून प्रा. मधुकर राळेभात यांच्या दिंडीतही भाविकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता.

सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांनी दोन्ही दिंड्यांचे स्वागत केले. तसेच चहापाणी व फराळाची सोय केली होती. यावेळी मंदिर समितीचे भरत काळे, सरपंच महेश काळे सुधीर काळे चेअरमन तुराब शेख व्हा. चेअरमन चंद्रभान वाळुंजकर, विलास भोळे, इत्यादी सह धनेगाव ग्रामस्थांनी योग्य नियोजन करून भाविकांची सोय करण्यासाठी परिश्रम घेतले होते.