जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
जामखेड शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरांचा उपद्रव आहे त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत.

रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यामधून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. याभागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते.
याकडे जामखेड नगर परिषदेने लक्ष देवून मोकाट जनावरांना ज्या मालकीची आहे त्यांना संपर्क करावा किंवा जी मोकाट जनावरे असतील त्या जनावरांना गो – शाळे मध्ये सोडून त्यांचे जतन करावे. अशी मागणी नागरिक व व्यापार्यांनी व्यक्त केली.
चौकट
रस्त्यावर किंवा मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप सुरू आहेत. रस्त्यावर टाकलेल्या या कचऱ्यामध्ये अन्नाच्या शोधासाठी मोकाट जनावरे येत आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.