ल.ना.होशिंग विद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न झाली.

0
228
जामखेड प्रतिनिधी
            जामखेड न्युज—–
 ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पालक शिक्षक सभा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आदरणीय श्री श्रीकांत होशिंग होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक आदरणीय श्री रमेश अडसूळ सर यांनी केले व शाळेतील विविध उपक्रम,नवीन योजना याबद्दल माहिती दिली.
यामध्ये शाळेची सुसज्ज अशी इमारत,उत्तम प्रयोगशाळा, भव्य असे ग्रंथालय, इयत्ता पाचवीचा आदर्श वर्ग,शनिवारी विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी कवायत,चेक पीरियडला सामान्य ज्ञान वाढीसाठी जनरल नॉलेज प्रश्न हा उपक्रम अशा विविध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल या सविस्तर माहिती दिली.
त्यावेळी गतवर्षीचे पालक शिक्षक संघाचे माझी उपाध्यक्ष तात्यासाहेब अडाले यांचा सत्कार करण्यात आला. व नवीन उपाध्यक्ष पालकांमधून सौ.उमा संजय कोल्हे ताई यांची निवड झाली. त्यावेळी त्यांचा प्राचार्य श्री.श्रीकांत होशिंग व सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्रीमती सुप्रिया घायतडक मॅडम पालक शिक्षक संघाच्या सचिव यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रथमता कार्यकारणी रचना याबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापक पालक शिक्षक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात,उपाध्यक्ष पालकांमधून निवडला जातो व सचिव म्हणून शिक्षक काम पाहतात.त्याच बरोबर 11 पुरुष पालक व 11 महिला पालक यांचीही सदस्य म्हणून निवड केली जाते.
त्यानंतर श्रीमती भालेराव मॅडम यांनी नवीन उपक्रमांमध्ये इयत्ता पाचवी क हा एक वर्ग आयडियल वर्ग म्हणून तयार केला आहे त्याबद्दल माहिती दिली.
या वर्गामध्ये सर्व विषयासंबंधी शैक्षणिक साहित्य बरोबर विद्यार्थ्यांना हसत खेळत अभ्यास करता यावा अशा पद्धतीने वर्गाची रचना केलेली आहे.अभ्यास, स्वच्छता,शिस्त याची वाढ होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे मत प्रदर्शित केले.
त्यानंतर विज्ञान प्रमुख श्री. रोहित घोडेस्वार सर यांनी शंभर टक्के अभ्यासक्रम नियोजन व विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक, भावनिक,विकास करताना नवीन शैक्षणिक धोरणानुसार 100% अभ्यासक्रमाचे नियोजन यावर भर देऊन विद्यार्थ्यांचा गुणात्मक व शैक्षणिक,सर्वांगीण विकास केला जाईल याबद्दल माहिती दिली.
त्यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री प्रवीण गायकवाड सर यांनी कोविड नंतरची शाळा या विषयावर माहिती दिली.
त्याचबरोबर कोविड पूर्वीची शाळा कोविड नंतरची शाळा विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये पडलेला खंड अजून काय हो तीन बदल केले भरून काढण्यासाठी पालकांनीही विद्यार्थ्यांसाठी जास्त वेळ द्यावा शिस्तीच्या बाबतीतही पालकांनी शिक्षकांना सहकार्य करावे विनंती केली. विद्यार्थ्यांना मानसिक आधार देत आता त्यांना मोबाईल कडून अभ्यास व मैदानाकडे वळवण्याचे काम आवश्यक आहे यासाठी पालकांनाही वेळ द्यावा लागेल असे आवाहन केले.
त्यानंतर पालकांमध्ये श्री भालेराव,अँड डोके, श्री व सौ मांढरे,श्रीमती उमा कोल्हे अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्याचबरोबर विविध उपक्रमांमुळे समाधानही व्यक्त करून सर्व शिक्षकांचे अभिनंदनही केले.
सर्व पालकांना पालक सभेमध्ये नवीन पद्धतीने डिजिटल वर्ग यावर विद्यार्थ्यांचा तास कसा घेतला जातो याचेही प्रात्यक्षिक कॉम्प्युटर शिक्षक श्री निलेश भोसले सरांनी करून दाखवले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीकांत होशिंग साहेब यांनी प्रथमतः सर्व उपस्थित संवेदनशील पालकांचे अभिनंदन करून सर्व क्रिएटिव्ह शिक्षकांचेही अभिनंदन केले.
त्याचबरोबर इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थी व पालक यांचेही अभिनंदन केले. इयत्ता दहावी व बारावीचा लागलेला उत्तम निकाल याचे सर्व श्रेय शिक्षकांचे आहे याबद्दल शिक्षकांचेही त्यांनी अभिनंदन केले.
यावर्षी नवीन उपक्रमामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुपर फिफ्टी वर्गाची निवड करून त्यांना विविध उपक्रमाद्वारे माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर पालकांना विनंती ही केली आहे आपल्या पाल्याला विविध छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देऊन त्याच्याशी योग्य संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊन त्याचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास करावयाचा आहे. यासाठी निश्चितच पालकांनाही वेळ द्यावा लागेल.कोरोना काळामध्ये जे सर्वांचेच नुकसान झाले आहे.त्यामध्ये महत्त्वाचा घटक विद्यार्थी आहे ते भरून काढण्यासाठी निश्चितच शिक्षक व पालक एकत्र येऊन विद्यार्थ्याच्या विकासासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे.
उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इयत्ता बारावी साठी हा एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत.
विद्यार्थ्याला एखादा प्रोजेक्ट करायला सांगितला तर तो विद्यार्थ्यांनीच करावा कारण पूर्वीची कथन पद्धत यामध्ये बदल होऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ज्ञानरचनावाद कृतीयुक्त शिक्षणावरच भर देण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच पालकांनी शिक्षकांना सहकार्य करावे अशी विनंती केली व पुनश्च सर्व पालकांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन समारंभ प्रमुख श्री संजय कदम व सर्व समारंभ समिती यांनी केले. या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
त्याचबरोबर सुंदर अशा पालक शिक्षकसंघ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख श्री अनिल देडे सर यांनी केले, आभार प्रदर्शन श्री संजय कदम सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here