राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक शहराध्यक्ष पदी पप्पूभाई सय्यद यांची निवड

0
180

जामखेड न्युज——

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक शहराध्यक्ष पदी
 पप्पूभाई सय्यद यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र नुकतेच कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिले. 
     दि. ७  रोजी आमदार रोहित पवारांच्या संपर्क कार्यालयत अल्पसंख्याकच्या पदाधिकारी निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात,अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष उमर कुरेशी, संजय वराट, विजय पवार, राजू गोरे, मोहन पवार, बजीरंग डुचे,  जमीर सय्यद, राजू वाव्हळ, शेरखान याचा, जुबेर शेख, जाकीर सर,  कुंडल राळेभात यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
   
   
    आमदार रोहित पवार यांचे नेतृत्वाखाली सर्वच अल्पसंख्यांक समाजास एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करून प्रलंबित असलेले प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पप्पूभाई सय्यद यांनी निवडी दरम्यान सांगितले.
    यावेळी पुढील प्रमाणे निवडी करण्यात आल्या
पप्पूभाई सय्यद – शहराध्यक्ष, समीर पठाण- कार्याध्यक्ष, चांद तांबोळी -तालुका उपाध्यक्ष, सलीम शेख तालुका उपाध्यक्ष, अमर चाऊस-गट प्रमुख, सय्यद राजू खर्डा -तालुका उपाध्यक्ष, अन्सार पठाण तालुका उपाध्यक्ष यांच्या सह अनेक निवडीचे पत्र देण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here