जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या पाडळी सेवा संस्थेवर जनसेवा शेतकरी विकास पॅनलचा सर्वच्या सर्व जागेवर दणदणीत बहुमताने विजय विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार यांचे पानिपत
कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. अविनाश पवार, विजय पवार व सतिश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाडळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जनसेवा शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व म्हणजे 12 जागेवर बहुमताने बाजी मारली आहे तर विरोधी पॅनलचे पानिपत झाले आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार यांच्या पत्नीचा दारूण पराभव झाला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत अनिल खैरे, बाळासाहेब खैरे, नामदेव लांडगे, डॉ. अविनाश पवार, राजाभाऊ पवार, शिवाजी पवार, सुरेश पवार, उद्धव पवार, अनिता दहिकर, रेखा खैरे, सतिश शिंदे, शिवानंद काळे हे उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी झाले निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
विजयी उमेदवारांचे अभिनंदन आमदार रोहित (दादा) पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, बुवासाहेब पवार, अशोक पवार, सुधीर पवार, बाळासाहेब मंजिराम खैरे, कचरूद्दीन शेख, नवनाथ पवार, फुलचंद पवार, भागवत पवार यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार यांच्या पत्नीला पराभवाला सामोरे जावे लागले तसेच अशोक काकासाहेब पवार यांचाही पराभव झाला व गणेश आजीनाथ खैरे यांनी पराभवाची हॅटट्रिक केली
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर व साहाय्यक म्हणून निलेशकुमार मुंडे यांनी काम पाहिले.