पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा द्यावी लागणार मैदानी चाचणी

0
279
जामखेड न्युज – – – 
राज्यातील सर्वात महत्त्वाची बातमी आहे. पोलीस भरतीसाठी जे तरुण अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आहे. पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस भरतीबाबत गृह विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
महाविकास आघाडी सरकारने भरती पद्धतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतल. जेणेकरून ग्रामीण तरूणांना पोलीस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल हा हेतू होता. पण, त्याची अंमलबजावणी आता आगामी भरतीवेळी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यापूर्वीच मागील काही वर्षांमध्ये पोलीस भरती करण्याचे नियोजन झाले होते. पण मध्यंतरी कोव्हिडमुळे दीड ते दोन वर्ष पूर्ण क्षमतेने पोलीस भरती झाली नव्हती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलीस भरती करण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here