जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
विरोधकांनी कितीही सत्तेत येण्याचा आव आणला तरीही सदिच्छा मंडळच सत्तेचा गुलाल घेणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सदिच्छा मंडळाला मोठे खिंडार पडले असे जे म्हणतात त्यांना स्वतःचे घर सांभाळता आले नाही ते बॅक काय सांभाळणार शिक्षक बँकेच्या येत्या निवडणुकीत सदिच्छा शिवाय सत्तेत जाणे, कोणालाही शक्य नाही.सदिच्छा जायंट किलरच्या भूमिकेत असेल त्यामुळे यावेळी गुलाल सदिच्छाच घेणार असा विश्वास राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केला
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅक लि.. पंचवार्षिक निवडणूक 2022 च्या अहमदनगर जिल्हा सदिच्छा मंडळ निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज दि. १८ रोजी जामखेड येथे झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते व विजयाचे चाणक्य समजले जाणारे राजेंद्र शिंदे होते यावेळी प्रमुख पाहुणे रविंद्र पिंपळे, उच्चाधिकारी समितीचे अध्यक्ष गजानन ढवळे, जिल्हा अध्यक्ष नारायण राऊत, माधव हसे, गहिनीनाथ शिरसाट, उद्धव दौंड, इब्राहिम शेख, हसे, वर्पे, धर्माची बडे, बाळासाहेब मोरे, ज्ञानेश्वर कोळेकर, महादेव गांगर्डे, केशव कोल्हे यांच्या सह मोठ्या संख्येने शिक्षक बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र शिंदे म्हणाले की, सदिच्छा मंडळ शिक्षकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी स्थापना झाली आहे. जामखेड तालुका सदिच्छा बरोबर आहे. विरोधक स्वबळाची भाषा करतात आणी दबाव दडपण आणून विरोधकांना फोडता हे कसले स्वबळ आहे. त्यांच्याकडे बळच नाही ओढून ताणून बळ असल्याचा आव दाखवतात एकदा विरोधकांच्या उमेदवारी जाहीर होऊ द्या मग बघा त्यांना मोठे भगदाड पडणार आहे असेही सांगितले.
यावेळी कामिनी राजगुरू यांनी सांगितले की, विरोधकांची नाटकेच आहेत आणखी मावळे सदिच्छा मंडळात येणार आहेत.
यावेळी सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत म्हणाले की, मागील काही दिवसात मंडळातून काही शिक्षक बांधव दुसऱ्या मंडळात गेले व सदिच्छाला मोठे खिंडार पडले अशा आशयाच्या बातम्या येत होत्या , त्या बातम्या संपूर्ण चुकीच्या असून सदिच्छा मंडळातून दुसऱ्या मंडळात कोणीही गेले नाही व जाणारा ही नाही. त्याच मंडळातील नावे पेपरला देऊन त्यांचा नवीन प्रवेश दाखवून आम्ही किती बुद्धिवान आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न गुरुमाऊली मंडळाच्या नेत्यांनी केला,त्यांच्या बुद्धीची कीव येते. शिक्षक संघाचे मंडळाचे नेते मा.दत्तात्रय राळेभात साहेब यांच्या काळापासून जामखेडची ओळख सदिच्छा मंडळाचा बालेकिल्ला आहे व राहील. सदिच्छाची ताकद निवडणुकीतून सर्वांना दाखवून देऊ असा विश्वास बोलताना मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री.नारायण राऊत सर यांनी सर्वांना दिला.
सदिच्छा ही संघटना व फक्त मंडळ नसून तर एक कुटुंब आहे. या मंडळामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य कुटुंबाप्रमाणे कायम एकत्र प्रेमाने राहतात.येत्या निवडणुकीतही त्याच प्रेमाच्या माध्यमातून सर्वाधिक मतदान जामखेड मधून सदिच्छा मंडळ घेईल. असा विश्वास देऊन कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
इब्राहिम शेख म्हणाले की, १९८४ पासून आजही तेवढीच ताकद आहे. बाप संघटना आहे. सदिच्छाच्या नादी लागू नका ह
गहिनीनाथ शिरसाट म्हणाले की, जामखेडचे सभागृह खचाखच भरलेले आहे. त्यामुळे आम्हाला कसलेही खिंडार नाही.
बबन गाडेकर म्हणाले की, श्रीगोंदा तालुका एक नंबरवरच राहणार, नारायण राऊत यांच्यात दम आहे विजयाच्या दिशेने निश्चितच सदिच्छा जाणार आहे.
यावेळी बोलताना माधव हसे म्हणाले की, सदिच्छा मंडळाचा विजय कोणीही रोखू शकत नाही. विकास मंडळाची एक हाती सत्ता सदिच्छा मंडळाच्या ताब्यात द्या,सर्व सभासदांची आरोग्यदायी व आनंददायी सेवा करू –
यावेळी बोलताना रविंद्र पिंपळे म्हणाले की, महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत यातच आमचा विजय निश्चित आहे.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना गोड बोलून,विकास मंडळाच्या नावाखाली 13 कोटी रुपये जमा केले,अन् बांधकाम अपूर्ण अवस्थेत ठेवले.त्यांचे मंडळ हे फक्त सोयर्या धायऱ्या चे मंडळ आहे.त्यांच्या स्वच्छ चेहऱ्याला भुलून जावू नका, या निवडणुकीत त्यांना घरी बसवा
यावेळी बाळू मोरे, निलेश बोराडे, ज्ञानेश्वर कोळेकर, रजनीकांत साखरे, अर्चना भोसले, अविनाश नवसरे, सिंधु अंधारे, मल्हारी पारखे, संतोष भोंडवे, नितीन मोहळकर, राजेंद्र त्रिंबके यांनी सदिच्छा मंडळाकडे उमेदवारी मागितली व जरी उमेदवारी मिळाली नाही तरीही सदिच्छा मंडळाचेच काम करणार असे सांगितले
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर कोळेकर व केशव कोल्हे यांनी केले तर आभार राजेंद्र जरे यांनी मानले
चौकट
विरोधक जे सदिच्छा फुटल्याची वल्गना करतात त्यांनी आपले स्वतःचे घर सांभाळावे जामखेड तालुका सदिच्छा मंडळाचा बालेकिल्ला आहे व राहणारच सदिच्छाची ताकद येत्या निवडणुकीत दाखवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदिच्छा मंडळ अहमदनगर जिल्हाध्यक्ष नारायण राऊत