जामखेड न्युज – – – –
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक होण्याची सुवर्णसंधी आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात 250 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी परीक्षा होणार आहे. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 चं आयोजन करण्यात आलंय. त्यानुसार ही परीक्षा 30 जुलैला पार पडणार आहे.
राज्यात एकूण 6 ठिकाणी परीक्षा केंद्र
विभागांतर्गत पीएसआय पदासाठी होणाऱ्या या मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास बुधवार 15 जूनपासून सुरुवात झाली आहे. तर इच्छूकांना 29 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्यातील एकूण 6 केंद्रावर या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद ही 6 परीक्षा केंद्र असणार आहेत.
अटी आणि शर्थी
पीएसआय पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांसाठी कमाल वय हे 35 इतकं असावं. तर मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष वाढीव देण्यात आली आहेत. म्हणजेच मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादा ही 40 वर्ष इतकी आहे.
असं असेल परीक्षेचं स्वरुप
दरम्यान ही परीक्षा एकूण 400 गुणांची असणार आहे. या 400 गुणांसाठी लेखी आणि आणि मैदानी चाचणीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुख्य परीक्षा ही 300 तर शारिरीक चाचणी परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे. उमेदवारांना या परीक्षेबाबत https://mpsc.gov.in/ या वेबसाईटरवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.