जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
शहरातील जीवन साई हाॅस्पिटलला प्रथमच शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मुळव्याध सर्जन डॉ. प्रदिप तुपेरे ( एम. एस. सर्जन) यांच्या तर्फे मोफत मुळव्याध शिबीराचे आयोजन केले आहे. तरी गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Advertisements

मुळव्याध व्याधीसाठी आता अहमदनगर, मिरज, औरंगाबाद किंवा पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही आपल्या जामखेड शहरातच अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मुळव्याध सर्जन डॉ. प्रदिप तुपेरे ( एम. एस. सर्जन) यांच्या तर्फे मोफत मुळव्याध पाईल्सवर इंजेक्शन द्वारे ट्रिटमेंट ( स्क्लेरोथेरपी) करण्यात येणार आहे.
मुळव्याध व्याधीसाठी आता आॅपरेशनची गरज नाही, खाण्याचे विशेष पथ्य नाही, अॅडमीट होण्याची गरज नाही, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, मुळव्याध (पाईल्स) वर अत्याधुनिक पद्धतीने उपचार, आजारासंबंधी जुने रिपोर्ट असतील तर अवश्य घेवून येणे, येताना उपाशीपोटी येणे सकाळी सहा नंतर काहीही खाऊ नये,
शौचास आग होणे, रक्त पडणे, खाज येणे, चिर पडणे ( फिशर), कोंब बाहेर येणे, इत्यादींवर खात्रीशीर व आधुनिक पद्धतीने औषधोपचार केले जाणार आहेत तरी या संधीचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुळव्याध व्याधीवर मोफत इंजेक्शन द्वारे उपचार करण्यात येणार आहेत यात लॅबची तपासणी फी व मेडिकलचे औषधे याचा खर्च रूग्णांना करावा लागेल. याची नोंद घ्यावी.
शिबीराचे ठिकाण जीवन साई हाॅस्पिटल बस स्टँड जवळ महाराष्ट्र बॅक रोड जामखेड येथे शनिवार दिनांक १८ जून रोजी सकाळी ११ ते ५ पर्यंत आहे.