जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आ.डॅा.सुधीर तांबे यांचे खंदे समर्थक जामखेड चे सय्यद जमीर इब्राहिम यांची प्रदेश काँग्रेस कमिटीवर निवड करण्यात आली आहे.
या निवडी बरोबर शहाजी राजेभोसले यांची जामखेड तालुका काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी देवीदास भादलकर यांची जामखेड शहराध्यक्ष पदी तर फेर निवड करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटीमधे कुंडल राळेभात, सुनील शिंदे, यांची निवड करण्यात आली आहे निवडणूक निरीक्षक कैसर आझाद व अँड.कैलास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दादा साळुंके यांच्या प्रमुख उपस्थित ही निवडणूक पार पडली.
यावेळी पुन्हा एक मताने सर्वांनीफिर निवड करून अभिनंदन केले व काँग्रेसच्या बळकटीसाठी पुन्हा एकदा संधी दिली यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तात्या ढेरे,जेष्ठ नेते,कर्जत चे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष किरण पाटिल, अंकुश उगले विशाल डूचे, युवक कार्याध्यक्ष राहुल उगले, मिलिंद बागल, आदेश सरोदे, महादेव बहिर, रामदास राऊत व पक्षाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक पार पडली.
नवनिर्वाचित प्रदेश बॉडी मध्ये सय्यद जमीर इब्राहीम तर तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले व शहराध्यक्ष देवीदास भादलकर व जिल्हा बॉडी मध्ये कुंडल राळेभात सुनील शिंदे यांचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब,आ.सुधीर तांबे,युवा नेते सत्यजीत तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दादा साळुंके, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,जिल्हा समनव्यक ज्ञानदेव वाफारे,,युवक कार्याध्यक्ष राहुल उगले ,महिला तालुकध्यक्ष ज्योतिताई गोलेकर,मंज़र सय्यद,गौतम पवार,विशाल डुचे,युवक चे तालुक़ा अध्यक्ष शिवराजे घुमरे,अशोक पाटिल,,फ़िरोज़ पठाण,जावेद शेख़,युवक चे शहराध्यक्ष विक्रांत अब्दूले,,अवधूत पवार आदीनी अभिनंदन केले.









