जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या श्री साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज साकत चा बारावीची निकाल १००% तर जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी पो. साकतचा निकाल ९९.५३% लागला आहे. संस्थेचे आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, सचिव प्रा. कैलास वराट, प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी केले आहे.
साकत सारख्या दुर्गम भागात वराट बंधुंनी दहा वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले आज मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे. हजारो विद्यार्थी आज या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक मेडिकल व इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये या संस्थेचे विद्यार्थी आहेत. संस्थेने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हि संस्था आकर्षण ठरली आहे.
श्री साकेश्वर ज्युनियर कॉलेजचा निकाल १००% लागला असून प्रथम कोंडेकर पारस ९४.६७%, द्वितीय झांजे संस्कृती ९४.००%, तृतीय चांडक पलक ९३.१६% तर कांबळे आर्या ९३.००% गुण संपादन केले आहेत.
काॅलेजमध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे २३ विद्यार्थी आहेत. ८५ ते ९० % गुण मिळवणारे ८३ विद्यार्थी आहेत तर ८० ते ८५ % गुण मिळवणारे ४३ विद्यार्थी आहेत. आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा काॅलेजने कायम ठेवली आहे.
संस्थेच्या दुसर्या जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.५३% लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक हलकंचे तनया ९२.३३% घोडके प्रगती ९२.३३%,
द्वितीय क्रमांक तावरे अभिषेक ९२.१६%, भोंडवे शिवम ९२.१६%तर तृतीय क्रमांक नरवणे सत्यम ९१.८३%, झगडे अर्णव ९१.८३,एकशिंगे संजीवनी ९२.८३ अशा प्रकारे क्रमांक पटकावले आहेत.
९० %पेक्षा जास्त गुण मिळवणारे ३१ विद्यार्थी आहेत तर ८५ ते ९० % गुण मिळवणारे १०२ विद्यार्थी आहेत ८० ते ८५%% गुण मिळवणारे ४८ विद्यार्थी आहेत.
संस्थेने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेचे वैशिष्ट्य निसर्गरम्य व सुसज्ज इमारत, प्रवरा पॅटर्न नुसार अध्ययन पद्धती, एम एस. सीईटी नीट जेईई परीक्षेचे जादा तास, वैयक्तिक लक्ष, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून Crop Science विषयास मंजुरी,
अनुभवी प्राध्यापक वृंद, भव्य क्रिडांगण आहे काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांनी दिली









