जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव परीसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने २६ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. याचे पंचनामे केलेले आहेत तसेच शेतीचे जे नुकसान झाले आहे त्याचे आज कृषी विभाग व महसूल विभाग संयुक्तपणे शेतीचे पंचनामे करणार आहेत असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.
बुधवारी जामखेड तालुक्यातील भवरवाडी, पाटोदा व खामगाव या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला यात वरील तीन गावात यातही भवरवाडी येथे जवळपास २६ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच शेतातही मोठ्या प्रमाणावर झाले उन्मळून पडले तसेच परिसरात मोठय़ा प्रमाणावर लिंबोणीच्या बागा आहेत या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीचे आज कृषी विभाग व महसूल विभाग संयुक्तपणे पंचनामे करणार आहेत अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव या भागात मोठय़ा प्रमाणात वादळी पावसाने नागरिकांची व शेतकर्यांची तारांबळ उडाली. भवरवाडी याठिकाणी श्रीकांत पारवे, बाळु पारवे, कुंडल गायकवाड व देविदास काळे यांच्या घरांची पडझड होऊन यातील काही घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघडय़ावर पडला होता
पाटोदा या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आण्णासाहेब गव्हाणे यांचे चिंचेचे झाड पडले तर दत्तात्रय कापसे यांच्या शेतातील लिंबोनीच्या बागातील झाडे उन्मळून पडले आहेत. तर नाना गव्हाणे यांच्या घराचे देखील नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांनी केली होती यानुसार भवरवाडी परिसरातील २६ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे यांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत तर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आज होणार आहेत