संगमनेर तालुक्यात वादळी पावसाने मृत्यूचे तांडव चौघांचा मृत्यू

0
219
जामखेड न्युज – – – 
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावा अंतर्गत असणार्या मुंजेवाडी शिवारात वादळी वाऱ्याने भिंत अंगावर पडून तीन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (९ जून ) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मृतांमध्ये एका १० वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हाहाकार उडवल्याचे चित्र आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावा अंतर्गत असणार्या मुंजेवाडी शिवारात वादळी वाऱ्याने भिंत अंगावर पडून तीन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (९ जून ) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मृतांमध्ये एका १० वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे.
मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुधवडे हे आपल्या कुटुंबासोबत राहात होते. गुरवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वारे सुटले व गारांचा पाऊसही पडू लागला. दुधवडे हे कुटुंबासोबत घरात बसले असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांब अंतरावर जाऊन पडले. घरातील मंडळी घाबरून गेली मात्र काही समजण्याच्या आतच घराच्या भिंतीही पडल्या. या भिंती थेट अंगावर पडल्याने विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय ७५), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय ६७ ), साहील पिना दुधवडे (वय १०) हे जागेवरच मयत झाले. तर वनिता पिना दुधवडे ( वय ८) आणि मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय ७०) हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती समजताच घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, महसूल मंडल अधिकारी इराप्पा काळे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मनसेचे किशोर डोके, शिवसेनेचे जनार्दन आहेर, पोलीस पाटील सीताराम आभाळे, सरपंच अरुण वाघ आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सरकारी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदतकार्य केले.
तर, दुसऱ्या घटनेत संगमनेर तालुक्यातीलच मालदाड येथे झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून संगमनेर तालुक्यात वादळी पावसाने हाहाकार उडवला आहे. शहरातून जाणाऱ्या नाशिक मार्गावर अनेक मोठी झाडे कोसळली आहेत. तर, शासकीय विश्रामगृह परिसरातही झाडे उन्मळून पडली आहेत. वादळी वाऱ्यासह आलेल्या पहिल्याच पावसाने संगमनेर तालुक्यात मृत्यूचे तांडव बघायला मिळाल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here