सोयाबीन बियाणे पेरणीबाबत कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

0
189
जामखेड न्युज – – – – 
खरीप हंगाम २०२२ साठी सोयाबीन पेरणी करतांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्याच्या कृषी विभागानेही शेतकऱ्यांना जाहीर आवाहन केले आहे. याबाबतचे परिपत्रक कृषी आयुक्तांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा. पेरणीपूर्व बीजप्रक्रीया करावी, चांगली ओल म्हणजे ७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी
७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी,  प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅटरचा वापर करून पेरणी करावी, सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी, रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी, बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे. असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here