Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या पडळकर म्हणजे राजकीय विकृत औलाद – रूपाली पाटील

पडळकर म्हणजे राजकीय विकृत औलाद – रूपाली पाटील

0
243
जामखेड न्युज – – – – 
भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर खालच्या पातळीवरची टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर भाजपाकडून मौन धारण करण्यात आलं असून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पडळकरांवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका केली आहे.
शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारलं असताना रुपाली पाटील म्हणाल्या की, “गोपीचंद पडळकर हे भाजपाचे आमदार आहेत. अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल. ते सतत शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर तोंडसुख घेत असतात. भाजपा नेते स्वत:ला सुसंस्कृत समजतात पण त्याच लोकांच्या या भावना आहेत. केवळ ते बोलू शकत नाहीत, म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात,” अशा बोचऱ्या शब्दांत रुपाली पाटील यांनी पडळकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!