जामखेड घोडेगाव रस्त्यावर मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू

0
430
जामखेड प्रतिनिधी 
         जामखेड न्युज – – – 
 जामखेड पासून ५ किलोमीटर अंतरावर सारोळा गावानजीक रात्री एकच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकल स्वार राजकुमार रत्नाकर शेळके (वय ४०) रा. घोडेगाव ता. जामखेड हल्ली मुक्काम पुणे हा इसम एका खड्ड्यात अंगावर मोटारसायकल पडून जागीच मृत्यू पावला.
  मयत राजकुमार रत्नाकर शेळके जामखेड वरून घोडेगाव ला जात असताना सारोळा गावानजीक हा अपघात झाला.
या ही घटनेत नेहमीप्रमाणे अपघात ग्रस्तांना तातडीने मदत करणारे जामखेड येथिल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना पोलिस कॉन्स्टेबल भागवत यांच्याकडून माहिती मिळताच कोठारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व आपल्या कोठारी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून सदर व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे आणला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आणि सहाय्यक  पोलिस निरीक्षक सुनील बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे या कामी पोलीस कॉन्स्टेबल सचिन सगर, पोलीस नाईक भागवत हे पाहत आहे तसेच या कामी महेंद्र क्षिरसागर यांनी कोठारी यांना मदत केली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here