Home ताज्या बातम्या पाणीटंचाईचे भीषण वास्तव! पाणी उपसताना पाय घसरला, आनंदवाडीच्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी...

पाणीटंचाईचे भीषण वास्तव! पाणी उपसताना पाय घसरला, आनंदवाडीच्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू जामखेड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली, पाण्यासाठी विहिरीच्या तळाशी गेलेल्या बबन गीते यांचा बळी

0
4
पाणीटंचाईचे भीषण वास्तव! पाणी उपसताना पाय घसरला, आनंदवाडीच्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू  जामखेड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली, पाण्यासाठी विहिरीच्या तळाशी गेलेल्या बबन गीते यांचा बळी

जामखेड न्युज – – – – – – 

पाणीटंचाईचे भीषण वास्तव! पाणी उपसताना पाय घसरला, आनंदवाडीच्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

जामखेड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली, पाण्यासाठी विहिरीच्या तळाशी गेलेल्या बबन गीते यांचा बळी

 

जामखेड तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे. आनंदवाडी येथे विहिरीचे खोल गेलेले पाणी उपसण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बबन बन्सी गीते (वय ४८, रा. आनंदवाडी, ता. जामखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जामखेड तालुक्यात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला असून, उपलब्ध पाणीही मोठ्या खोलीवर गेले आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन वापरासाठी पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

गुरुवारी सकाळी बबन गीते हे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेले होते. विहिरीच्या तळाशी गेलेले पाणी काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बबन गीते यांना विहिरीतून बाहेर काढले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेने आनंदवाडी गावावर शोककळा पसरली असून, गीते यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुष्काळाचा वाढता विळखा
जामखेड तालुक्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असून, विहिरी, बोअरवेल आणि इतर पाणीस्रोत आटत चालले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या शोधात नागरिकांना खोल विहिरींच्या तळाशी जावे लागत असल्याने अशा दुर्घटनांचा धोका वाढला आहे.

आनंदवाडी येथील ही घटना पाणीटंचाईचे गांभीर्य अधोरेखित करणारी असून, प्रशासनाने या भागातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती तातडीने लक्षात घेऊन टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, ही घटना जामखेड तालुक्यातील दुष्काळाचा पहिला बळी असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. प्रशासनाकडून याबाबत अधिकृत पुष्टी झाल्यानंतरच ही बाब निश्चित मानता येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!