Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ऐकावे ते नवलच – नवऱ्याशी नाही तर स्वत:शीच लग्न करणार तरूणी

ऐकावे ते नवलच – नवऱ्याशी नाही तर स्वत:शीच लग्न करणार तरूणी

0
239
जामखेड न्युज – – – – 
गुजरातमधील बडोद्यामध्ये 24 वर्षांची क्षमा बिंदू ( (Kshama Bindu) ही तरूणी स्वत:शीच लग्न करणार आहे. स्वत:शी लग्न करण्याच्या या प्रकाराला सोलोगॅमी (Sologamy) म्हणतात. हा देशातील पहिलाच प्रकार आहे. लहानपणापासून कधीच लग्न करण्याची इच्छा नव्हतीच. लग्न ही परंपरा तिला कधीच आवडली नसली तरीही नवरी (Bride) होण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे तिनं स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
या लग्नासाठी नवरीनं जय्यत तयारी केलीय. कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंतची सर्व गोष्टींची तिनं खरेदी केली आहे.
गोत्री येथे राहणाऱ्या क्षमाने एमएस युनिव्हर्सिटीमधून (MS University) समाजशास्त्र (Sociology) विषयात पदवी घेतली आहे. लोकं त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात. मी स्वतःच्याच प्रेमात आहे आणि म्हणूनच मी अशाप्रकारे लग्न करत आहे,’ अशी भावना क्षमानं व्यक्त केली आहे.
क्षमाने आपल्या लग्नाची निमंत्रणं पाठवली आहेत. मेंदी समारंभ 9 जून रोजी होणार आहे आणि लग्न 11 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता होईल. ती मेंदी समारंभासाठी पांढरं धोतर आणि कुर्ता घालणार आहे तर हळदीच्या व लग्नाच्या दिवशी साडी नेसणार आहे. क्षमानं लग्नाची पत्रिका देखील वाटली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या लग्नाला तिचे 15 मित्र आणि सहकारी उपस्थित राहणार आहेत क्षमा लग्न झाल्यानंतर दोन आठवड्यांसाठी गोव्याला हनिमूनसाठीदेखील जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!