जामखेड न्युज – – – –
शिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालून ग्रामीण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी जामखेड महाविद्यालयात प्राचार्य डॉ सुनिल नरके यांच्या मार्गदर्शनाने व प्रयत्नाने 2 जून रोजी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात टाटा मोटर्स, महिंद्रा, अजय पॉलिमर्स, असाही इंडिया ग्लास इत्यादी औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधीं मार्फत जामखेड तालुक्यातील पदवी व इतर बेरोजगार तरुण तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मेळाव्यात जामखेड पंचक्रोशीतील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. सकाळी ८: ३० वाजेपासूनच विद्यार्थ्यांनी नोंदणी साठी गर्दी केली होती. या मेळाव्यात सुमारे तीनशे विद्यार्थी मुलाखतींला सामोरे गेले.
यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. उध्दवराव (बापू) देशमुख यांनी औद्योगिक प्रतिनिधींचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. अरूणशेठ(काका) चिंतामणी, सचिव मा. शशिकांतजी देशमुख, संचालक मा. अशोकशेठ शिंगवी इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या.
या नोकरी मेळाव्याच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल विध्यार्थ्यांनी विशेष आभार व्यक्त केले प्रा. गोलेकर, प्रा. धनाजी पवार, प्रा. नितीन तरटे, प्रा. शिवाजी राळेभात, प्रा.ऋषीकेश देशमुख, प्रा. योगेश पेटकर, प्रा. नितीन राऊत आणि प्रा. तुकाराम घोगरदरे, प्रा. किरदात, प्रा. तुषार मिसाळ इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
या मेळाव्याला सर्व स्तरांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रसाद काळे, प्रकाश कोल्हे, सूरज उगले, आणि वैष्णवी शिंदे या विद्यार्थ्यांनी कल्पक जाहिरात चित्रफीत देखील बनवली होती. एकूणच या मेळाव्याबाबत तरुणांमध्ये उत्साह दिसून येत होता.
महाविद्यालयातील रोजगार कक्षाच्या माध्यमातून या नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या या नाविन्यपूर्ण व रोजगार मिळवून देणाऱ्या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.




