जामखेड न्युज – – – –
बीडच्या (beed) केज-अंबेजोगाई रोडवर (kej -Ambejogai Road) होळ गावाजवळ इनोव्हा ( Innova car ) आणि अॅपे रिक्षाची (rickshaw ) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहे तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज-अंबेजोगाई रोडवर होळ गावाजवळ आज संध्याकाळी हा अपघात घडला आहे.
भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने ( एमएच १६ सीएन ७०० ) अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षाच्या चक्काचूर झाला आहे. तर इनोव्हाच्या सर्व एअरबॅग उघडल्या गेल्या.
या अपघातात रिक्षाचा चालक बालाजी मुंडे ( रा . पिसेगाव, ता . केज ) याच्यासह चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतात सहा महिने आणि एक वर्षे वय असलेल्या दोन बालकांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी असलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. चालक वगळता इतर मृत आणि जखमी शिकलकरी समाजाचे असून एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.