ऐकावे ते नवलच –  चक्क जॅक लावून घर चार फूट वर उचचले

0
239
जामखेड न्युज – – – 
औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एका घरमालकाने चक्क जॅक लावून अख्खे घरच जमिनीपासून उखडून चार फूट वर उचचले. उताराचा भाग असल्याने दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी यायचे. त्यामुळे वैतागलेल्या घरमालकाने  हाऊस लिफ्टिंगचा हा अनोखा प्रयोग करत घराची उंची वाढवली आहे. अशा प्रकारे जमिनीपासून संपूर्ण घर वर उचलण्याची ही औरंगाबादेतील किंबहुना मराठवाड्यातील पहिलीच घटना असल्याच बोलले जात आहे. यापूर्वी पुण्यात सुद्धा असाच प्रयोग करण्यात आला होता.
शहरातील सातारा भागात राहणारे आनंद कुलकर्णी हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. कुलकर्णी यांनी 2011 मध्ये सत्कर्मनगरात दोन हजार चौरस फूट भूखंडावर आपल्या स्वप्नातील घर बांधले. कालांतराने आजूबाजूला आणखी घर बांधली गेली. त्यामुळे काही वर्षांनी गल्लीतून जाणारा रस्ता उंच झाला. घर खाली झाल्याने दरवर्षी घरामध्ये पावसाचं पाणी साठू लागलं. त्यामुळे या अडचणीतून बाहेर पडण्याचा कुलकर्णी मार्ग शोधत असताना त्यांना हाऊस लिफ्टिंगबाबत माहिती मिळाली. यावर बराच विचारकेल्यानंतर कुलकर्णी यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले घर वर उचलण्याचा निर्णय घेतला.
पावसाळा सुरु होताच गल्लीतील पाणी थेट घरात येत असल्याने कुलकर्णी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागायचा. घर तोडून पुन्हा बांधणे सुद्धा खूप खर्चीक असल्याने तेही शक्य नव्हते. दरम्यान यु-ट्यूबवरून त्यांना हरियाणात काहीजण घर जॅकच्या साह्याने उचलून देत असल्याचे समजले. त्यामुळे कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनतर 5 मी रोजी प्रत्यक्षात घर जॅकच्या साह्याने उचलण्याचे काम सुरु झाले.
कमी खर्चात घर उंच…
घराची उंची कमी झाल्यानंतर त्याला पाडून नवीन बांधणे खूप खर्चीक असते. तसेच नवीन घर बांधायचे तर प्रतीचौरस फुटाचा खर्च दीड हजाराच्या वर आहे. तर दुसरीकडे हाऊस लिफ्टिंगचा साह्याने घर उचलल्यास प्रतीचौरस फुटाचा खर्च सरासरी 230 रुपये इतका आहे. त्यामुळे नवीन घर बांधण्यापेक्षा आहे त्या स्थितीत घर उचलण्यासाठी कमी खर्च लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here