जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – ( सुदाम वराट )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शंभुराजे कुस्ती संकुल मंगेश (दादा) आजबे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत क्रमांक एकची कुस्ती माऊली जमदाडे विरूद्ध बाला रफिक शेख यांच्यातील एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची कुस्ती बरोबरीत सुटली त्यामुळे दोघानाही विभागून बक्षिस देण्यात आले तर क्रमांक दोनची कुस्ती
सागर मोहळकर विरूद्ध बाबू मुलानी अशी होती यात मुलानीने बाजी मारत एक लाख रुपयांचे बक्षिस जिंकले
तृतीय क्रमांकाची कुस्ती बापू जरे विरूद्ध अक्षय डुबे होती यात बापू जरे याने बाजी मारून पंचाहत्तर हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. राज्यस्तरीय कुस्ती हगाम्याचे हे तिसरे वर्ष असून दिवसेंदिवस शेतकरी व सर्व सामान्य जनतेचा प्रतिसाद वाढत चालला आहे. या हगाम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर प्रमुख पाहुणे म्हणून होते. यात नगरपरिषद निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा तुपकर यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे व शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून ते ल. ना. होशिंग विद्यालयापर्यंत भव्य रॅली व मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून सुरवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, संचालक मकरंद काशीद, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार, सुंदरदास बिरंगळ,अभिमनू पवार, कुस्ती सम्राट अस्लम काजी, बाळासाहेब आवारे यांच्या उपस्थितीत पार पडला
कार्यक्रम घडून आणण्यासाठी मंगेश (दादा) आजबे, पै. शरद कार्ले, पै. मोहन पवार, पै. श्रीधर मुळे, पै. बालाजी जरे, पै. विठ्ठल देवकाते, कृष्णा चव्हाण, दादाराजे भोसले, प्रदीप बहिर यांनी परिश्रम घेतले व कुस्त्यांचे समालोचन करणारे धनाजी मदने यांनी प्रेक्षकांची मने जिंकली
यावेळी जामखेड न्युजशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की, जामखेड नगरपरिषदेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असून जनतेच्या अपेक्षेप्रमाणे निश्चितच परिवर्तन घडवून नगरपरिषदेवर स्वाभिमानीचा झेंडा पडकविला जाईल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.
तुपकर म्हणाले की, जामखेड नगरपरिषदेत जनतेला परिवर्तन हवे आहे आणी ते स्वाभिमानी शेतकरी संघटना नगरपरिषदेच्या सर्वच्या सर्व जागा लढवून स्वबळावर सत्ता मिळवून नगरपरिषदेवर स्वाभिमानीचा झेंडा फडकविणार आहोत असा विश्वास व्यक्त केला. तसेच शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना ते म्हणाले की, मोदी सरकारचे शेतकरी कायदे हे आदाणी व आंबाणीच्या फायद्याचे आहेत. यात त्यांचाच फायदा होणार आहे. शेतकरी व ग्राहक हा भरडला जाणार आहे.
राज्यस्तरीय कुस्ती हगाम्याचे हे तिसरे वर्ष असून राज्यभरातील मल्ल या हगाम्यासाठी हजेरी लावतात व मोठ मोठे इनाम जिंकतात दिवसेंदिवस हगाम्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे.